स्पर्धेसाठी
काव्यप्रेमी शिक्षक मंच नागपूर जिल्हा आयोजित रा
पंडिता रमाबाई
जन्मगाव गंगमूळ डोंगर वस्ती
म्हैसूर संस्थान मंगलोर जवळी
मातापिता विचार पुरोगामीत्वाचे
दिली स्त्री शिक्षणाची ओंजळी
संस्कृत व्याकरण, साहित्याचे
प्रगाढ ज्ञान देन आईवडिलांची
विविध भाषा, प्रकांड पंडित
कलकत्ता स्थानी कदर बुद्धीची
बिरुदावली सिनेटमध्ये खास
पंडीता व सरस्वती सन्मानाची
आंतरजातीय विवाह करुनी बंड
छेडले बालविवाह,पुनर्विवाह बंदीची
आर्य महिला समाज स्थापना
मदतीसाठी त्याज्य भगिनींच्या
पत्करला रोष समाजाचा एकटीने
धैर्याने सामोरे गेल्या विरोधी रुढींच्या
घेण्या प्रगत ज्ञान भाषा इंग्रजीचे
घेण्या शिक्षण वैद्यकशास्त्राचे
सोडला देश अन् रवाना इंग्लंडला
विचार पटले तेथे येशू ख्रिस्ताचे
रोष पत्करून सनातन्यांचा
धर्मांतर केले ख्रिस्ती धर्माचे
शारदा सदन विधवांसाठी खास
मोल जाणूया रमाईच्या कर्माचे
रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा.कोल्हापूर